मुंबई

नवी मुंबईतील स्थानके मध्य रेल्वेच्या ताब्यात!

CD

नवी मुंबईतील स्थानके
मध्य रेल्वेच्या ताब्यात!

सिडकाेसह संयुक्त बैठकीत निर्णय; सहा महिन्यांत हस्तांतर पूर्ण हाेणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील रेल्वे स्थानके सहा महिन्यांत मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, सिडको आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत याबाबत सकारात्मक तोडगा निघाला. यामुळे नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील देखभाल, दुरुस्ती आणि प्रवासी सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वे मुख्यालयात शुक्रवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि रखडलेली देखभाल कामे यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक स्थानकांच्या देखभाल करारांची मुदत संपूनही नव्याने करार न झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. नवी मुंबईतील मानखुर्द-बेलापूर, ठाणे-तुर्भे-वाशी-नेरूळ तसेच नेरूळ-उरण मार्गावरील स्थानकांचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ही स्थानके मध्य रेल्वेकडे तातडीने हस्तांतरित करावीत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती, तिकीट खिडक्या सुरू करणे, भुयारी मार्ग आणि पादचारी पुलाची रखडलेली कामे सुरू करण्यावर भर देण्यात आला. रेल्वे प्रशासनाने स्थानके हस्तांतराची प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्यास सहमती दर्शवली आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे आणि दैनंदिन देखभाल मध्य रेल्वे करेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
---
...लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नवी मुंबईतील लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथूर, मुख्य अभियंता नवीन पाटील, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेवक अनिकेत म्हात्रे, भावेश पाटील, ज्ञानेश्वर जाधव, दिनेश जाधव तसेच अन्य संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------
संपूर्ण ताब्याची मागणी
रेल्वे प्रशासनाने केवळ रेल्वेचा परिचालन परिसर नव्हे, तर संपूर्ण स्थानक परिसर हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानक परिसरातील व्यावसायिक दुकाने, महसुली उत्पन्न देणाऱ्या जागा तसेच सर्व आर्थिक उत्पन्नाशी संबंधित परिसरही मध्य रेल्वेकडे देण्यात यावा, अशी भूमिका रेल्वे अधिकाऱ्यांची आहे. प्रवाशांना खऱ्या अर्थाने उत्तम सुविधा द्यायच्या असतील, तर स्थानकांचा संपूर्ण ताबा रेल्वेकडे देणे आवश्यक असल्याचे मत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT