मुंबई

मुंबईची ‘कायदा सुव्यवस्था’ मनोजकुमार शर्मांकडे

CD

मुंबईची ‘कायदा सुव्यवस्था’ मनोजकुमार शर्मांकडे
राज्य पोलिस दलात ९६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, ता. १५ ः गृहविभागाने शुक्रवारी महाराष्ट्र पोलिस दलातील आयपीएस, राज्य सेवेतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या. विभागाने संध्याकाळी जारी केलेल्या आदेशांनुसार ९६ पोलिस अधिकाऱ्यांच्या त्याच पदावरून पदोन्नतीने बदली जाहीर केली. यात मुंबई पोलिस दलातील सहापैकी पाच सहआयुक्तांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे.

‘ट्वेल्थ फेल’ चित्रपटातून घराघरात पोहाेचलेले आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांच्यावर गृहविभागाने मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवली आहे. याआधी ते राज्य पोलिस दलात विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) पदावर नियुक्त होते. त्यांची मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्त सत्यनारायण चौधरी यांची सहपोलिस आयुक्त(वाहतूक) तर अनिल कुंभारे यांच्यासह पोलिस आयुक्त (गुन्हे) अशी बदली करण्यात आली.

मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्याकडे राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभातील विशेष पोलिस महानिरीक्षक, सहपोलिस आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्याकडे फोर्स वनचे विशेष पोलिस महानिरीक्षक, सहपोलिस आयुक्त (आर्थिक गुन्हे) निशिथ मिश्रा यांच्याकडे विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण) या पदांची जबाबदारी सोपविण्यात आली. या बदल्यांमुळे रिक्त झालेल्या सहपोलिस आयुक्त (प्रशासन), आर्थिक गुन्हे या पदांवर अनुक्रमे सुवेझ हक, राजेश प्रधान या आयपीएस अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले.
शहरातील दोन अतिरिक्त आयुक्त आणि तीन उपआयुक्तांची गृह विभागाने पदोन्नती देत बदली केली. त्यात अतिरिक्त आयुक्त महेश पाटील (पूर्व प्रादेशिक विभाग) यांना विशेष पोलिस महानिरीक्षक, नियोजन आणि समन्वय, परमजितसिंह दहिया यांना विशेष पोलिस महानिरीक्षक, एटीएस तर उपआयुक्त प्रवीण मुंढे, कृष्णकांत उपाध्याय, दीक्षित गेडाम यांना अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून बढती देऊन मुंबईतच पदस्थापना देण्यात आली. याशिवाय शहरातील संदीप जाधव, अकबर पठाण, महेश चिमटे, मितेश घट्टे, विशाल ठाकूर, वैशाली शिंदे यांच्या शहराबाहेर बदली करण्यात आली.
----
ठाण्यात उगले, पाठक, देशमुख यांची बदली
ठाणे पोलिस दलातील अतिरिक्त आयुक्त पंजाबराव उगले, विनायक देशमुख आणि एस. व्ही. पाठक यांची बदली करण्यात आली. उगले यांच्याकडे पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (पदअवनत करून), देशमुख यांच्याकडे वैधमापन विभागाच्या नियंत्रकपदाची तर पाठक यांच्याकडे राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील आर्थिक गुन्हे विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबादारी सोपविण्यात आली. उपआयुक्त सचिन गोरे यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT