मुंबई

आयटीआय प्रवेशनाेंदणी २१ मेपासून

CD

आयटीआय प्रवेश नाेंदणी २१ मेपासून
दहावीच्या गुणपत्रिका वितरित झाल्यानंतर वेळापत्रक

मुंबई, ता. १५ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयमधील विविध ट्रेडच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया व त्याची नोंदणी प्रक्रिया २१ मेपासून सुरू केली जाणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून आपले प्रवेश शुल्क भरता येतील.

विद्यार्थ्यांना या प्रवेशासाठीचे शुल्क भरल्यानंतर त्यांना या प्रवेशासाठी विकल्प प्राधान्यक्रम भरता येईल. राज्यातील सर्व शैक्षणिक मंडळाकडून त्या त्या शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचे वितरण झाल्यानंतर या आयटीआय प्रवेशासाठी नव्याने सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे आज संचालनांकडून जाहीर करण्यात आले. राज्यात एकूण एक हजारहून अधिक खासगी आणि शासकीय आयटीआय आहेत. यामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये एक लाख ५७ हजार ६६६ प्रवेशाची मर्यादा आहे.
--
मुंबईत अशा आहेत जागा
मुंबई विभागात शासकीय ६७ आयटीआयमध्ये एकूण १५,१९२ तर खासगीच्या ३९ आयटीआयमध्ये १,४१२ अशा एकूण १०६ आयटीआयमध्ये २०,७०४ जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षी संचालनाकडून नीट नियोजन न झाल्याने मुंबई आणि परिसरातील आयटीआयमध्ये प्रचंड जागा रिक्त राहिल्या होत्या, तर विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मागील वर्षी राज्यभरात प्रवेश कमी होण्यासाठी मोठा फटका पडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT