मुंबई

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

CD

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १७) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे -
कुठे ः ठाणे-कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर
कधी ः सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत
परिणाम ः या ब्लॉकदरम्यान डाऊन जल/सेमी जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. याव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तसेच कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/सेमी जलद सेवा कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, पुढे अप जलद लोकल सेवा दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबतील. अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा आपल्या निर्धारित वेळापत्रकाच्या १० मिनिटे उशिराने पोहोचेल. तसेच सीएसएमटी/दादरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या अप-डाऊन मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळविण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे
कुठे ः पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी ः सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम ः ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील. यादरम्यान सीएसएमटी ते वाशी सेक्शनवर विशेष गाड्या धावतील. तर, ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाइन सेवा उपलब्ध राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT