मुंबई

‘गुगल’, ‘ॲपल’ला सायबरची नोटीस

CD

‘गुगल’, ‘ॲपल’ला सायबरची नोटीस
ओला, उबर, रॅपिडो ॲप हटविण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : राज्यातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवांविरोधात महाराष्ट्र शासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रवासी सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा आणि परिवहन नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने ओला, उबर आणि रॅपिडोची ॲपल आणि गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्याबाबत गुगलला माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत नोटीस बजावली आहे. परिवहनमंत्र्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालयाने शुक्रवारी ही नोटीस जारी केली. त्यात राज्यात काही ॲप-आधारित कंपन्यांकडून आवश्यक परवानग्या आणि शासनाची मान्यता न घेता मोठ्या प्रमाणावर बाइक टॅक्सी सेवा चालवली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सेवा मोटार वाहन कायदा तसेच परिवहन विभागाच्या विद्यमान नियमांचे उल्लंघन करून असल्याचा दावा विभागाने केला आहे.

नोटीसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चालक पडताळणीची अपुरी व्यवस्था, विमा संरक्षणाचा अभाव, महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची कमतरता आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेतील त्रुटी यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बेदरकार वाहनचालक आणि नियमबाह्य वाहतूक व्यवस्थेमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचेही सायबर विभागाने स्पष्ट केले. आदेशाचे पालन न झाल्यास भारतीय कायद्यांनुसार कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

अपघातानंतर कठोर कारवाई
अलीकडेच बाइक टॅक्सी सेवेशी संबंधित एका अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेचाही नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून अशाच प्रकारच्या तक्रारी पुढे आल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे समजते.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT