येस बँकेच्या राणा कपूर यांच्यावर गुन्हा नोंद
मुंबई, ता. १५ ः येस बँक तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर आणि सिक्युरिटी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक सुधीर वालिया आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर तब्बल एक हजार कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. एचडीआयएल कंपनीच्या निलंबित संचालकाने केलेल्या तक्रारीआधारे ही कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. एचडीआयएल कंपनीने २०१६मध्ये एस बँकेकडून १५० कोटींचे कर्ज घेतले. त्या बदल्यात सुमारे एक हजार कोटींच्या मालमत्ता तारण ठेवल्या; मात्र बँकेने मुदतीआधीच या मालमत्ता कायदेशीर प्रक्रिया न पाळता वालिया यांच्या कंपनीकडे हस्तांतरित केल्या. हस्तांतरण प्रक्रियेसाठी या कंपनीस सुमारे २२ कोटींचे मार्जिन मनी बँकेने उपलब्ध करून दिले. यातील काही मालमत्ता कमी किमतीत विकण्यात आल्या. त्यामुळे एचडीआयएल कंपनीला एक हजार कोटींचा तोटा झाला, असा आरोप तक्रारीत करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.