मुंबई

१९ वर्षीय तरुणीच्या थायरॉईड गाठीवर यशस्वी उपचार

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ ः थायरॉईड शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करीत हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथील डॉक्टरांनी १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या थायरॉईडमधील गाठ अत्याधुनिक स्कारलेस शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे काढून टाकली. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेनंतर तिच्या मानेवर कोणताही दृश्यमान व्रण राहिलेला नाही.

या विद्यार्थिनीच्या थायरॉईडच्या डाव्या भागात सुमारे चार सेंटीमीटर आकाराची फॉलिक्युलर निओप्लाझम गाठ आढळली होती. गाठीच्या निदानानंतर शस्त्रक्रिया आवश्यक होती; मात्र पारंपरिक शस्त्रक्रियेमुळे मानेवर कायमस्वरूपी व्रण राहण्याची भीती तिला होती. त्यामुळे डॉक्टरांनी ट्रान्सओरल एंडोस्कोपिक थायरॉईडेक्टॉमी व्हेस्टिब्युलर ॲप्रोच या आधुनिक पद्धतीचा पर्याय निवडला.

या तंत्रामध्ये खालच्या ओठाच्या आतील भागातून लहान छेद घेऊन थायरॉईड ग्रंथी काढली जाते. त्यामुळे मानेवर बाह्य छेद द्यावा लागत नाही आणि कोणताही दिसणारा व्रण राहत नाही.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारली. तिच्या आवाजावर किंवा घशाच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम झाला नाही. अल्प पुनर्वसनानंतर ती पुन्हा शिक्षण आणि दैनंदिन आयुष्यात परतली आहे.

‘एचएनसीआयआय’चे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुलतान प्रधान म्हणाले, ‘ही थायरॉईड उपचारातील महत्त्वाची प्रगती आहे. या पद्धतीमुळे पारंपरिक शस्त्रक्रियेइतकीच सुरक्षितता मिळते; मात्र मानेवरील व्रण टाळता येतो. विशेषतः तरुण रुग्णांसाठी हा मोठा फायदा आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT