मुंबई

दिव्याज फाउंडेशनतर्फे योगदिनी समाजसेवा

CD

मुंबई, ता. २२ ः आंतरराष्ट्रीय योगदिनी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनतर्फे वरळी डोम येथे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य योग आणि ध्यानधारणा कार्यक्रमासह समाजसेवी उपक्रम करण्यात आले.

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील ७०० हून अधिक मुलांना यावर्षीच्या योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते. अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने दिव्याज फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात व्यापक समाजसेवा केली जाते. गेली आठ वर्षे त्यांच्यातर्फे शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, आर्थिक स्वावलंबन अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्य केले जाते. समाजसेवा, क्रीडा, संगीत, योग, कौशल्य विकास यांच्यासह संस्थेने सर्वांगीण समाजसेवा आणि विकासकामे केली आहेत.

योग म्हणजे केवळ एक व्यायाम किंवा कार्यक्रम नसून शरीर, मन आणि भविष्य एकत्र जोडणारी साधना आहे. भारताची ही अमूल्य परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जागतिक स्तरावर पोहोचली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील महाराष्ट्राच्या राजकारणातील योगगुरू आहेत. योगतत्त्वज्ञानाप्रमाणे त्यांनीही राज्याच्या प्रगतीत संतुलन साधून विकासाचा मार्ग कायम ठेवला आहे, असेही लोढा या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT