विरार-बोळिंजच्या गृह प्रकल्पात म्हाडा उभारणार जलकुंभ
स्विमिंग टँकऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; म्हाडाला लवकरच प्रस्ताव देणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : म्हाडाच्या विरार-बोळिंज येथील गृह प्रकल्पातील पाणीबाणीचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून येथे जलकुंभ उभारला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव कोकण मंडळाकडून मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. दरम्यान, या गृहप्रकल्पात स्विमिंग टँक उभारण्याचे म्हाडाचे नियोजन होते. मात्र, ते बाजूला सारून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी म्हाडाकडून प्राधान्य दिले जाणार आहे.
वसई-विरार परिसारात असलेल्या घरांच्या मागणीची दखल घेत म्हाडाने २०१६ मध्ये विरार येथे सहा हजारहून अधिक घरे बांधली होती. सदर घरांच्या विक्रीला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र, कोकण मंडळाने वेगवेगळे प्रयत्न करून बहुतांशी घरे विकली आहेत. दरम्यान, येथील रहिवाशांना पाण्याची समस्या सातत्याने जाणवते. त्यासाठी याआधी म्हाडाकडून टँकरने पाणी उपलब्ध करून दिली जात होते. मात्र, आता सदरची पाणी समस्या कायमची दूर करण्याच्या हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, या गृह प्रकल्पात स्विमिंग टँक उभारण्याची योजना बाजूला करत जलकुंभ उभारला जाणार आहे. त्यासाठी स्विमिंग टँकरसाठीचा सुमारे दीड कोटीचा निधी याकरिता वापरला जाणार असल्याचे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डाॅ. विशाल राठोड यांनी दिली.
टँकरला नकार
बोळिंज येथील म्हाडाच्या इमारतीला कमी पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांची गैरसोय टाळण्यासाठी म्हाडाकडून टँकरने पाणी उपलब्ध करून दिले जात होते. त्यानुसार यंदाही रहिवाशांनी टँकरची मागणी केली होती. दरम्यान, पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असून त्याकरिता म्हाडाने सुमारे ५-६ कोटी रूपये मोजले आहेत. त्यामुळे म्हाडाने यंदा टँकर उपलब्ध करून देण्यास नकार देतानाच वसई-विरार महापालिकेला पत्र देत रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याबाबत स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.