मुंबई

शमीर पटेल यांचे नगरसेवक पद रद्द

CD

शमीर पटेल यांचे नगरसेवकपद रद्द
जात प्रमाणपत्र अवैध

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २२ : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३७ (एम-पूर्व विभाग) मधून इतर मागास (ओबीसी) राखीव प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आहे. अहमदनगरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या महासभेतही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. ​​जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २७ मे २०२६ रोजी शमीर पटेल यांचे ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. मुंबई महापालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १६ (१सी)(अ) च्या तरतुदीनुसार, राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्याचे पद त्याच तारखेपासून रिक्त होते. त्यानुसार पटेल यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड २७ मे २०२६पासूनच कायदेशीररीत्या आपोआप रद्द झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नगरसेवक म्हणून कार्यकाळात मिळालेले मानधन आणि इतर भत्ते परत घेतले जातील. नगरसेवकपदाचे अधिकृत ओळखपत्र, महापालिकेची बोधचिन्हे आणि इतर आनुषंगिक सोयीसुविधा तातडीने परत घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
...
पोटनिवडणूक होणार?
​शमीर पटेल यांचे पद रद्द झाल्यामुळे प्रभाग क्रमांक १३७ मधील नगरसेवकपद आता रिक्त झाले आहे. यामुळे या प्रभागात आगामी काळात पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT