मुंबई

संप मागे, तरी प्रवाशांचे हाल

CD

संप मागे, तरी प्रवाशांचे हाल
बेस्टच्या १०० कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप रविवारी रात्री मागे घेण्यात आला; मात्र अनेक कर्मचारी कामावर न आल्याने बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही. परिणामी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना बस थांब्यांवर ताटकळत उभे राहावे लागले. बस नसल्याने लोकल आणि मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी होती. दरम्यान, बेस्ट प्रशासनाने १०० कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई केली.
बेस्टचा संप रविवारी रात्री मागे घेण्यात आल्यानंतर सोमवारी ​सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत बेस्टच्या स्वतःच्या २०० आणि कंत्राटी १,६७१ बस रस्त्यावर आल्या होत्या. दुपारपर्यंत नियोजित दोन हजार ७६६ पैकी केवळ एक हजार ८७१ बसच रस्त्यावर धावत होत्या. कंत्राटी बसचे चालक-वाहक अत्यंत कमी संख्येने हजर असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. दुपारी ३ नंतर परिस्थिती काहीशी सुधारली. बेस्टच्या स्वतःच्या ४३७ पैकी ३७१ बस, तर खासगी कंत्राटदारांच्या २,४६५ पैकी १,८४० बस रस्त्यावर धावत होत्या. स्वतःच्या बसवर ४,०८३ चालक व ४,१३० वाहक हजर झाले, तर कंत्राटी बसवर केवळ १,६३७ चालक आणि ४७० वाहक उपस्थित होते. ​खासगी कंत्राटदारांकडील चालक-वाहकांची टंचाई संध्याकाळपर्यंत जाणवत होती. तरीही, कर्मचारी परतण्याचे प्रमाण वाढत असल्याने हळूहळू सेवा पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला आहे.
........
सलग तीन दिवस आंदोलनात व्यस्त असल्यामुळे कर्मचारी थकले आहेत. त्यामुळे ते हळूहळू कामावर रुजू होत असून, टप्प्याटप्प्याने सेवा पूर्ववत होईल.
- ॲड. उदय आंबोणकर, बेस्ट कृती समितीचे संयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Akola Atrocity Act News: अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रकरणांत कायद्याचे तंतोतंत पालन करा : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे निर्देश

मोठी बातमी! TMC च्या ६० आमदारांनी ममता बॅनर्जीना अध्यक्षपदावरून हटवलं, अभिषेक बॅनर्जींनाही केलं सस्पेंड, राजकारण तापलं...

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Latest Marathi News Live Update: पीकविम्याच्या योजनेत बदलाची गरज सॅटेलाइट सर्वेत अडचण; लाभातून यवतमाळ जिल्हा वगळला

SCROLL FOR NEXT