मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

CD

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
ऑगस्टच्या पगारात मिळणार फरकाची रक्कम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : एसटी महामंडळातील सर्व कामगार संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत वार्षिक वेतनवाढ एक टक्के फरक, वाढीव महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑगस्टच्या पगारात ही वाढ लागू करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. त्यामुळे २९ जून रोजी राज्यभरात होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेत सर्व श्रमिक संघटनांची मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. २०१६ ते २०२० दरम्यानचा एक टक्का वेतनवाढीचा मुद्दा प्रलंबित होता. तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या वेतनामध्ये देण्याचे परिवहन मंत्र्यांनी मान्य केले. प्रलंबित महागाई भत्ता आणि घर भाड्याची वाढ सुद्धा ऑगस्टच्या पगारात देण्याचे मान्य केले. वाढीव महागाई भत्ता, घर भाडे आणि वेतनवाढीतील फरक जानेवारी २०२७ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन स्थगित करीत असल्याचे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT