मुंबई

परदेशी तरुणाची लग्नानिमित्ताने फसवणूक

CD

लग्नाच्या भूलथापा देऊन
परदेशी तरुणाची फसवणूक

मुंबई, ता. २२ ः मुंबईत एका तरुणासोबत ‘लिव्ह इन’मध्ये असताना निव्वळ आर्थिक फसवणुकीसाठी ब्रिटन येथील भारतीय वंशाच्या तरुणासोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या महिलेविरोधात डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तक्रारदार तरुणाच्या दाव्यानुसार अवघ्या काही दिवसात या महिलेने १६ लाख रुपये उकळले.
ब्रिटनमध्ये स्थायिक तक्रारदार तरुणाचा अलीकडेच घटस्फोट झाला होता. तो नव्या जोडीदाराच्या शोधात होता. संकेतस्थळावर आरोपी महिलेचे प्रोफाइल पाहून ते प्रभावित झाला. प्रोफाईलमध्ये तिनेही घटस्फोटीत असल्याचे नमूद केले होते. दोघांनी चर्चा केली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. निवडक नातेवाईक, मित्रांच्या उपस्थितीत ब्रिटनमध्ये साखरपुडा आटोपला. त्यापूर्वी व्हिसा, तिकिटांसाठी महिलेने तरुणांकडून पैसे घेतले होते, महागड्या भेटवस्तूही घेतल्या होत्या.
काही दिवसानंतर दोघांकडून लग्नाची तयारी सुरू झाली; मात्र दिवसेंदिवस महिलेकडून विविध कारणांसाठी पैसे मागण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे संशय आलेल्या तरुणाने महिलेची चौकशी सुरू केली. योगायोगाने तिच्या मित्र-परिवारातील एक व्यक्ती तरुणाच्या परिचयाचा निघाला. या महिलेने अशाप्रकारे अनेकांना फसवल्याचे आणि मुंबईत ती एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये असल्याची माहिती या व्यक्तीकडून प्राप्त होताच तरुणाने तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT