मुंबई

दारूच्या नशेत पोलिस वाहनालाच धडकला

CD

दारूच्या नशेत पोलिस वाहनालाच धडकला
दुचाकीचालकास अटक
मुंबई, ता. २३ ः दारूच्या नशेत भरधाव दुचाकी चालवून गस्तीवरील पोलिस वाहनाला धडकणाऱ्या तरुणाला दादर पोलिसांनी अटक केली. हा अपघात सोमवारी पहाटे दादरच्या खेड गल्लीत घडला. सुनील धर्मा (२८) असे आरोपी तरुणाचे नाव असून, तो घाटकोपरच्या कामराज नगरचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर पोलिस ठाण्यात नियुक्त अंमलदार शिवाजी झिने आणि त्यांचे सहकारी रविवारी रात्री गस्त घालत होते. पहाटे ही पथक खेड गल्ली परिसरातून दादर पोलिस ठाण्याकडे येत असताना समोरून भरवेगात येणारी बुलेट पोलिस वाहनाला धडकली. पोलिसांनी लागलीच दुचाकीचालकाला ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यास वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले. चाचणीत ते दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार दारूच्या नशेत वाहन चालवणे, शासकीय वाहनाचे नुकसान करणे या गुन्ह्यात सुनील यास अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil and Devendra Fadnavis : शरद पवारांचे खासदार दिल्लीत नरेंद्र मोदींच्या भेटीला जाण्यापूर्वी जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास; राजकीय चर्चांना उधाण

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

SCROLL FOR NEXT