मुंबई

पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढणार

CD

पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढणार
दोन दशकांपासूनच्या मागणीला मिळणार न्याय; सरकारची सकारात्मक भूमिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पारंपरिक मच्छीमारांची गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासूनच्या पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ७६ दिवसांपर्यंत वाढविण्याची मागणी आता पूर्णत्वास जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ३१ जुलैऐवजी १५ ऑगस्टपर्यंत बंदी वाढविण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, यासंदर्भातील प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विधी विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सात सागरी जिल्ह्यांतील मच्छीमार जिल्हा समित्यांकडून अभिप्राय मागविला होता. रायगड वगळता इतर सर्व जिल्ह्यांनी या प्रस्तावाला समर्थन दिले आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन मागणीचा पाठपुरावा केला. या वेळी सरकारकडून बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यासंदर्भात सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती मंत्र्यांनी दिल्याचे समितीचे पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले. बंदीचा कालावधी वाढल्यास मत्स्यसंपत्ती संवर्धन, मासळीच्या पिल्लांचे संरक्षण, माशांच्या प्रजननाला पोषक वातावरण आणि भविष्यातील मत्स्योत्पादन टिकवून ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचे समितीने नमूद केले.

बेकायदा मासेमारीवर लगाम
बैठकीत पावसाळी बंदीदरम्यान सुरू असलेल्या बेकायदा मासेमारीवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली. बंदीच्या काळात मासेमारी करणाऱ्या नौकांचे परवाने रद्द करणे, अशा नौकांकडून मासळी खरेदी करणाऱ्या व्यापारी व पुरवठादारांवर कारवाई करणे, बेकायदा मासळीच्या वाहतुकीवर निर्बंध आणणे तसेच अशा मासेमारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समितीने केली. या मागणीला पालघरचे आमदार राजेंद्र गावित, बोईसरचे आमदार विलास तरे आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनीही समर्थन दिले आहे.

पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढल्यास मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला पोषक वातावरण आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेला मोठी मदत होईल. यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव विधी विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
- देवेंद्र दामोदर तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Tilak Varma: श्रीलंका, तेलंगणा अन् थेट मुंबई! मित्राच्या शपथविधीसाठी तिलक वर्माची खास उपस्थिती,'मी त्याला लहानपणापासून...

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी

आयुष्यातले तीन टर्निंग पॉइंट! चाहत्यांच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं उत्तर , म्हणाली...'काही लोकांना माफ तर...'

SCROLL FOR NEXT