मुंबई

बोगस डॉक्टरांवरून जोरदार गदारोळ

CD

बोगस डॉक्टरांवरून जोरदार गदारोळ
विरोधी पक्षनेत्यांसह लोकप्रतिनिधी आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : महापालिका रुग्णालयांतील अनागोंदी कारभार, कंत्राटी पद्धतीमुळे वाढलेल्या बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटावरून महापालिका सभागृहात विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात एका खाजगी कंत्राटदारामार्फत विनानोंदणी बोगस डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून अतिदक्षता विभागात कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सभागृहात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
​विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी याप्रकरणी पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला. केईएम, नायर, कूपर, सायनसारख्या रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्ण विश्वासाने येतात; मात्र कंत्राटदारांकडून बोगस डॉक्टरांची भरती करून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. व्ही. एन. देसाई रुग्णालयातील या प्रकाराची मानवाधिकार आयोगाने दखल घेत पालिका आणि पोलिसांना नोटीस बजावली आहे. त्यापुढे कंत्राटी पद्धत बंद करून स्थानिक मराठी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी भरती करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. या चर्चेत अश्रफ आझमी, सईदा खान आणि श्रद्धा जाधव यांनी मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. बेहरामपाडा, वडाळा आणि झोपडपट्टी परिसरांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून, पालिकेचा त्यावर वचक राहिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. पीपीपी मॉडेल आणि कंत्राटी धोरण मारक ठरत आहे. ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’ धोरण अपयशी ठरले असून, जुनाट औषधे दिली जात आहेत, अशी टीका सईदा खान यांनी केली. अंकित प्रभू यांनी कूपर रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट असून, रुग्णांना उंदीर चावल्याची धक्कादायक माहिती दिली. सचिन पडवळ यांनी बोगस डॉक्टर भरत सावंत आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
​----
लवकरच ५८४ डॉक्टरांची भरती
तक्रारीनुसार संबंधित दोषींना व कंत्राटदारांना वेळोवेळी काळ्या यादीत टाकले आहे. सर्व कंत्राटी डॉक्टरांच्या पदव्यांची व नोंदणीची तपासणी केली जाईल. पालिकेमध्ये सध्या ५८४ डॉक्टरांची भरती शेवटच्या टप्प्यात असून, रखडलेले टेंडर रद्द करून ‘जॅम पोर्टल’रद्वारे पारदर्शक पद्धतीने नवे टेंडर काढले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT