मुंबई

एसटीच्या कर्मचाऱ्यांना अर्थलाभ

CD

एसटीच्या कर्मचाऱ्यांना अर्थलाभ
विधिमंडळात घोषणा; आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात, घरभाडे भत्त्यात आणि वार्षिक वेतनवाढीच्या दरात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधिमंडळात ही घोषणा केली. या निर्णयानंतर प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करताना सरनाईक यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार रविवारी एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेण्यात आली. एसटी ही केवळ परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांत गेली आठ दशके सेवा देणाऱ्या लालपरीचा खरा आधार म्हणजे एसटी कर्मचारी असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयानंतर २९ जूनचे प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
...
भत्त्यांमध्ये वाढ
सरकारच्या निर्णयानुसार महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून १०-२०-३० टक्के करण्यात आला असून, वार्षिक वेतनवाढीचा दरही दोन टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात आला आहे.
...
आर्थिक भार वाढणार
या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांना मान्यता देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि अन्य वैधानिक देणी मिळून सुमारे ५,६४९ कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT