मुंबई

तुतारी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

CD

तुतारी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
चार तास उशिराने धावणाऱ्या गाडीतील प्रवाशांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : ट्रेन क्रमांक ११००३ दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये सोमवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जोड इंजिन लावून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्याचा परिणाम लोकल सेवांवरही झाला.
दादर स्थानकावरून रात्री १२.०५ वाजता सुटणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसला दिवा ब्लॉकमुळे आपल्या नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास ५५ मिनिटे म्हणजे उशिराने म्हणजे मंगळवारी पहाटे चार वाजता रवाना करण्यात आली. दरम्यान, घाटकोपर परिसरात पहाटे ४.३५ वाजता इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी लूप लाइनवर घेण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले. इंजिनमधील बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यात यश न आल्याने पर्यायी इंजिन मागविण्यात आले. सकाळी ६.१५ वाजता जोड इंजिन लावल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. दरम्यान, इंजिनमध्ये नेमका कोणत्या कारणामुळे बिघाड झाला, याबाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
---
लोकल सेवेलाही फटका
तुतारी एक्स्प्रेसला आणखी विलंब झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. तसेच सकाळच्या गर्दीच्या वेळेतील उपनगरीय सेवांवरही परिणाम दिसून आला. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्या काही मिनिटे उशिराने धावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT