मुंबई

आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; आजपासून कामकाज पूर्ववत

CD

आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; आजपासून कामकाज पूर्ववत
परिवहन मंत्र्यांच्या आश्वासनानंतर निर्णय; पदोन्नतीचा प्रश्न दोन दिवसांत सोडविणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील (आरटीओ) कर्मचाऱ्यांचा आठ दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदोन्नतीचा प्रश्न दोन दिवसांत सोडविण्याचे तर अन्य प्रलंबित मागण्यांबाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारपासून (ता. २४) आरटीओ कार्यालयांचे कामकाज पूर्ववत होणार आहे.

१६ जूनपासून विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संपावर होते. या काळात वाहन नोंदणी, परवाने, परवान्यांचे नूतनीकरण आणि इतर अनेक सेवांवर परिणाम झाला होता. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३१ आमदार आणि खासदारांनीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती परिवहन मंत्र्यांकडे केली होती. तसेच विविध लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करण्याची तयारी दर्शविल्याने सरकारवरील दबाव वाढला होता.

मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
मंगळवारी मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी चर्चेचे नेतृत्व केले. पदोन्नती, प्रतिनियुक्ती, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि इतर प्रलंबित प्रश्नांबाबत संघटनांनी आपली बाजू पुराव्यांसह मांडली. या वेळी प्रशासनाच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.

१५ दिवसांत निर्णय
चर्चेनंतर पदोन्नतीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले. तसेच इतर प्रलंबित मागण्यांवर कर्मचारी हिताचा निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी मागितला. आयुक्त स्तरावर स्वतंत्र चर्चा करून प्रश्न सोडविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT