मुंबई

बेस्ट थांबा स्थलांतरावरून खडाजंगी

CD

बेस्ट थांबा स्थलांतरावरून खडाजंगी
विधानसभा अध्यक्षांच्या दबावाचा आरोप, प्रस्ताव अखेर परत
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २३ : गेट वे ऑफ इंडियाजवळील बेस्ट बस थांबा स्थलांतराच्या प्रस्तावावरून मंगळवारी (ता.२३) बेस्ट समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दबावामुळेच हा प्रस्ताव आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला.
राहुल नार्वेकर यांनी ११ मार्च २०२६ रोजी बेस्ट महाव्यवस्थापकांना पत्र लिहून गेट वेजवळील बस थांबा म्युझियमसमोरील जागेत हलवण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने समितीसमोर हा ठराव आणला. बैठक सुरू होताच अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी कोणतीही चर्चा न करता प्रस्ताव मान्य करण्याच्या सूचना दिल्या. यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे सदस्य नितीन नांदगावकर यांनी हरकत घेत थेट विधानसभा अध्यक्षांच्या दबावाचा आरोप केला. निर्णय बदलेपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा नांदगावकर यांनी दिल्याने अध्यक्षा व सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दबावाचे सर्व आरोप फेटाळून लावले. गेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती. माझ्यावर कोणाचाही राजकीय दबाव नाही, किंबहुना तसा दबाव टाकण्याची कोणाची हिंमतही नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले; मात्र विरोधकांचा वाढता आक्षेप आणि प्रवाशांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले.
​----
... तर बेस्टचे नुकसान!
​सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकावरून सुटणाऱ्या बस क्र. ए-११२ आणि ए-११६ या दोन बसमध्ये वर्षभर प्रवाशांची तुफान गर्दी असते. दररोज ४३६ फेऱ्यांतून २४ हजार प्रवासी प्रवास करतात आणि सरासरी १ लाख १७ हजारांचा महसूल मिळतो. रविवारी तर तब्बल एक लाख ९८ हजारांचे उत्पन्न मिळते. इतका मोठा महसूल देणारा मार्ग राजकीय दबावापोटी बदलून बेस्टचे नुकसान केले जात आहे, असा घणाघात नांदगावकर यांनी केला. हा प्रस्ताव तूर्तास रखडल्याने बेस्टच्या प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT