मुंबई

सेन्सेक्स ८९३ अंश घसरला

CD

सेन्सेक्स ८९३ अंश घसरला
मुंबई, ता. २३ : जागतिक शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण तसेच आयटी आणि धातूनिर्मिती कंपन्यांच्या शेअरमधील मोठी विक्री यामुळे मंगळवारी (ता. २३) भारतीय शेअर बाजार निर्देशांक एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले. सेन्सेक्स ८९३.३९ अंश तर निफ्टी २७८.८० अंश घसरला.

निर्देशांकांची सुरुवात आज चांगली झाली होती. पहिले दोन तास सेन्सेक्स ७७ हजारांच्या घरात होता; मात्र नंतर नफावसुलीसाठी मोठी विक्री आली आणि निर्देशांक गडगडले. दिवसअखेर सेन्सेक्स ७६,२००.६८ अंशांवर तर निफ्टी २३,८२४.१० अंशांवर स्थिरावला. व्यवहार सुरू होताना आशियाई शेअर बाजार मोठी घसरण दाखवत होते आणि अमेरिकेचे शेअर बाजारही घसरण्याची शक्यता दिसत होती. त्यामुळे आज सर्वत्र नकारात्मक वातावरण होते. कोरियाचा कोस्पी निर्देशांक तर नऊ टक्के घसरून त्याला सर्किट ब्रेकर (व्यवहार काही काळासाठी बंद होणे) लागले. दुसरीकडे आज युरोपीय शेअर बाजाराही अर्धा ते एक टक्का तोटा दाखवित होते. जपानचा निक्की निर्देशांक तीन टक्के घसरला, हॉँगकॉँगचा हँगसेंग पावणेदोन टक्के तर शांघाई व तैवानचे निर्देशांक सव्वा टक्का घसरले.

स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अर्धा ते पाऊण टक्का घसरले. भारतात औषधनिर्मिती आणि बांधकाम व्यवसाय ही दोनच क्षेत्रे नफा दाखवित होती. त्याखेरीज आयटी, धातूनिर्मिती, दूरसंचार, सरकारी बँका ही क्षेत्रे एक ते तीन टक्का घसरली. जगात धातूंच्या किमती घसरल्याने धातूनिर्मिती निर्देशांक तीन टक्क्यांच्या आसपास घसरले. गेल्या पाच सत्रांत परदेशी वित्त संस्थांनी ९० कोटी डॉलर मूल्याच्या शेअरची खरेदी केली आहे.

आज सेन्सेक्समध्ये फक्त पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, सन फार्मा, मारुती या शेअरचे भाव किरकोळ वाढले. त्याउलट इन्फोसिस आणि टीसीएस हे आयटी शेअर तीन टक्के घसरले. तर एचसीएल टेक आणि टेक महिंद्र हे आयटी शेअरदेखील घसरले. त्याखेरीज बीईएल, टाटा स्टील, अदाणी पोर्ट या शेअरचे भाव दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. तर एटर्नल, स्टेट बँक, टायटन, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ट्रेंट, बजाज फिन्सर्व्ह, इंडिगो, आयसीआयसीआय बँक, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भावदेखील घसरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT