मुंबई

महाराष्ट्रात आव्हान कौशल्य तफावतीचे : मंगलप्रभात लोढा

CD

महाराष्ट्रात आव्हान कौशल्य तफावतीचे : मंगलप्रभात लोढा

मुंबई, ता. २३ : राज्यात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत; पण उद्योगांना लागणारी आवश्यक कौशल्ये आणि उपलब्ध मनुष्यबळ यांच्यातील तफावत हेच सध्या सर्वात मोठे आव्हान असल्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे सांगितले.

एमआयटी इंडियातर्फे आयोजित ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट फ्युचर समिट २०२६’च्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. केवळ पदवी मिळविणे पुरेसे नाही. उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्यांची जोड मिळाल्यासच शिक्षणाचे खरे मूल्य वाढते. राज्य शासन कौशल्य विकासावर भर देत असून, या प्रक्रियेत एमआयटी इंडियासारख्या शैक्षणिक संस्था उद्योग आणि शासन यांच्यात प्रभावी दुवा म्हणून काम करीत आहेत, असेही लोढा या वेळी म्हणाले. या वेळी एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंग व विश्वशांती गुरुकुल वर्ल्ड स्कूलचे समूह संचालक दिग्विजय सुनील कराड यांनी विकसित भारत २०४७चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली. भविष्यातील कौशल्यसंपन्न मनुष्यबळ घडविण्यासाठी एमआयटी इंडिया सातत्याने उद्योगांसोबत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेत एआय, भविष्यातील रोजगार, कौशल्य विकास, स्टार्टअप्स, गुंतवणूक आणि उद्योग-शिक्षण सहकार्य या विषयांवर विविध तज्ज्ञांची पॅनेल चर्चा, गोलमेज बैठका, हॅकेथॉन, गुंतवणूकदार मेळावे आणि सामंजस्य करार झाले. या उद्‍घाटन सत्राला ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. परिषदेची सांगता ‘मुंबई एचआर लीडरशिप अवॉर्डस्’ वितरणाने झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT