मुंबई

राजकारण थांबवून प्रशासनावर लक्ष द्या!

CD

राजकारण थांबवून प्रशासनावर लक्ष द्या!
आदित्य ठाकरे यांची टीका
मुंबई, ता. २४ : मुंबई आणि उपनगरांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळित झाल्याने आता यावरून राजकीय वातावरणही तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील पाणी साचण्याच्या परिस्थितीवरून सरकारवर टीका केली. केवळ राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रशासनावर लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी महापालिकेचा निधी संपवल्याचा गंभीर आरोप भाजपवर केला तसेच मुंबईसारख्या किनारी शहराला पूरमुक्त करण्यासाठी ‘स्पंज सिटी’ बनवण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी २०१८-१९मध्ये पालिकेच्या माध्यमातून आपण पर्जन्यजल साठवण टाक्यांचे काम सुरू केले होते. २०२० ते २०२२ दरम्यान आम्ही हिंदमाता, गांधी मार्केट आणि मिलन सबवे येथे या टाक्यांची उपयुक्तता सिद्ध केली. सध्या प्रशासन हिंदमाता येथील पंप आणि पाण्याच्या टाक्या योग्यरीतीने चालवतदेखील नाही. त्यामुळे या परिसरात पुन्हा पाणी साचत आहे. गेल्या चार वर्षांत भाजप राजवटीने पालिकेचा निधी ओरबाडला; परंतु एकही नवीन पर्जन्य जलसाठवण टाकी बांधली नाही. तसेच आमच्या काळातील समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्पही या सरकारने पुढे नेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT