मुंबई

अदाणी समूहाचा अणुऊर्जा क्षेत्रात प्रवेश

CD

अदाणी समूहाचा अणुऊर्जा क्षेत्रात प्रवेश
वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अदाणी यांची घोषणा

मुंबई, ता. २४ : ‘अदाणी समूहाने आर्थिक वर्ष २०२६मध्ये देशात पायाभूत सुविधांमध्ये दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक केली आहे. समूह आता अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रातही प्रवेश करणार आहे,’ असे समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी बुधवारी (ता. २४) समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.


गेल्या वर्षभरात समूहाने केलेली दीड लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक ही त्या वर्षात एकंदर खासगी क्षेत्राने केलेल्या भांडवली गुंतवणुकीच्या ३० टक्क्यांहून जास्त आहे, असेही ते म्हणाले. ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, साठवणूक आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात समूहाने जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक पायाभूत सुविधा व्यवस्था निर्माण केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. अदाणी समूह भारतात राष्ट्रीय हवाई वाहतूक व्यवस्था तयार करीत असून, याअंतर्गत उत्पादन, देखभाल-दुरुस्ती, ओव्हरहॉल सेवा आणि पायलट प्रशिक्षण यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान समूहाने निर्मिती केलेल्या ड्रोन, अँटिड्रोन प्रणाली, क्षेपणास्त्रे, दारूगोळा यांची मदत भारतीय सेनादलांना झाली होती, असेही अदाणी यांनी सांगितले. अमेरिकी प्राधिकरणांसोबतची कायदेशीर प्रकरणे आता मिटली असून, मागील महिन्यातच अमेरिकी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनसोबत १.८ कोटी डॉलरचा दिवाणी समझोता झाला आहे. यासोबत आता अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ जस्टीसने समूहाविरुद्धचे सर्व फौजदारी आरोप कायमस्वरूपी काढून टाकल्याचेही त्यांनी जाहीर केले.

दोन लाख कोटींची गुंतवणूक
समूहाने अदाणी ॲटॉमिक एनर्जीच्या माध्यमातून २०३५ पर्यंत १० गीगावॉट अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भूतानमध्ये पाच हजार मेगावॉट जलविद्युत क्षमता विकसित केली जाईल. दोन लाख कोटी रुपये खर्च करून कंपनी पुढील पाच वर्षांत वीज उत्पादन क्षमता ४५ गीगावॉट करेल, असेही अदाणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambanli Ghat: आंबेनळी घाटात अपघातांना ब्रेक! अँटी-क्रॅश बॅरिअर्स, सुरक्षा भिंतींसह आधुनिक सुरक्षायंत्रणा उभारण्यास सुरुवात, बांधकाममंत्र्यांची माहीती

IPO: अवघ्या 2 दिवसांत 44 पट सबस्क्राइब! ज्वेलरी कंपनीच्या IPO ची बाजारात धूम; GMP तब्बल 36%; मोठ्या कमाईची संधी?

सोलापूर शहरातील ‘या’ ५ पोलिस ठाण्यास मिळणार नवे प्रभारी! तिघांना पदोन्नती, दोघांचा कार्यकाळ पूर्ण; ‘या’ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, कोणाला मिळणार संधी

Maharashtra Rain Update : पावसाची दमदार सलामी; मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Water Scarcity : पुरंदर-बारामतीची चिंता वाढली; ‘नाझरे’ची भिस्त मृत साठ्यावर

SCROLL FOR NEXT