मुंबई

मुंबईत ४ ऑक्टोबरला ‘सेखों एअर फोर्स मॅरेथॉन’

CD

मुंबईत ४ ऑक्टोबरला ‘सेखों एअर फोर्स मॅरेथॉन’
नोंदणी प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : भारतीय हवाई दलातील परमवीरचक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांच्या शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ ‘सेखों इंडियन एअर फोर्स मॅरेथॉन २०२६’चे (एसआयएम -२६) आयोजन करण्यात आले आहे. मुंबईसह देशातील सात शहरांत ४ ऑक्टोबरला ही मॅरेथॉन होणार असून, त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे.
मुंबईतील मॅरेथॉनचे आयोजन भारतीय हवाई दलाच्या मुख्यालय देखभाल कमांडतर्फे करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हवाई दलाने केले आहे. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों हे भारतीय हवाई दलातील एकमेव परमवीरचक्र विजेते आहेत. त्यांच्या शौर्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच संरक्षण दलाची मूल्ये आणि देशसेवेची भावना नागरिकांमध्ये रुजविणे, हा या मॅरेथॉनचा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाशीही या उपक्रमाची सांगड घालण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मॅरेथॉनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
...
नोंदणी कुठे कराल?
मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी www.sekhoniafmarathon.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. मॅरेथॉनसंबंधी अधिक माहितीसाठीही या संकेतस्थळाला भेट देता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: रक्षाबंधनाच्या तोंडावर साखरेचे दर घसरले! किरकोळ बाजारातही मिळणार फायदा; सरकारच्या नव्या कोटा पद्धतीचा काय परिणाम होणार?

Bolero Bike Accident : टुणकी-लाडणापूर मार्गावर भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने बोलेरो पेटवली

Pune Traffic Update: पुण्यातील 'ट्रॅफिक'बाबत मोठी अपडेट! शहरातील 'मिसिंग रोड'च्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात अजून किती भारतीय नागरिक बेपत्ता? MEA कडून मोठं अपडेट समोर; संपूर्ण आकडेवारी सांगितली!

Sonal Dinusha Story: रक्षाबंधन स्पेशल! बहिणीने उधार पैसे घेऊन दिली होती पहिली बॅट; आज त्याच भावाने भारताविरुद्ध गाजवलं नाव

SCROLL FOR NEXT