मुंबई

‘पादचारी प्रथम’ अभियानाचा धडाका

CD

‘पादचारी प्रथम’ अभियानाचा धडाका
१३४ पदपथ अतिक्रमणमुक्त, १९७ किमीचे रस्ते मोकळे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : महापालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील १३४ पदपथांवरील अतिक्रमणे हटवून तब्बल १९७ किलोमीटर लांबीचे रस्ते पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवली जात आहे.

आयुक्तांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना या अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) कारवाईचा आढावा स्वतः आयुक्त घेत असून, मुंबईतील व्यावसायिक व नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ‘एस’ विभागांतर्गत सर्वाधिक वर्दळीच्या भांडुप रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरात गेल्या दोन दिवसांत विशेष मोहीम राबवून ९४ अनधिकृत स्टॉल्स हटवण्यात आले. भांडुपमधील नियोजित १४ पैकी ११ पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू झाले आहे. या कारवाईमुळे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा मार्ग मोकळा झाला असून, लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या पादचाऱ्यांची कोंडीतून सुटका झाली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त संतोषकुमार धोंडे आणि ‘एस’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई झाली. यासाठी पाच जेसीबी, १० डम्पर, ५० हून अधिक अधिकारी, १०० कामगार आणि ७० पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

कारवाई सुरूच राहणार
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील २६ वॉर्डांमधील २०० पदपथांपैकी १३४ पदपथांचे काम हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत १,४५९ ठिकाणी प्रत्यक्ष दंडात्मक व निष्कासनाची कारवाई झाली आहे. पदपथ हे केवळ पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यावर दुकाने, स्टॉल्स किंवा साहित्य ठेवून अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCA च्या किचनला ८७ गुण, तरी FDAची कारवाई; हायकोर्टाने घेतला आक्षेप, ५ लायसन्सवरील निलंबन हटणार

Success Story: वय 16, कंपनीत 15 कर्मचारी अन् वडिलांनाच देतो 2 लाखांचा पगार! केरळच्या या ‘AI Kid’ची भन्नाट कहाणी

Ather Konark Electric Scooter Launch : एथर एनर्जीची ‘कोनार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 200 किमीपर्यंत रेंज, बॅटरीवर 10 वर्षांची वॉरंटी

MPSC Exam : कोणताही क्लास न लावता ऋषीकेश राज्यात पहीला; उद्योग निरीक्षक व दुय्यम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कपदी निवड

Mamata Banerjee: मोठी बातमी! ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी स्वतः घेतली दखल

SCROLL FOR NEXT