उपोषणकर्त्यांची काळजी घ्या!
आणखी बळी नकोत; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश
गडचिरोली सर्पदंशामुळे मृत्यूचे प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींच्या मृत्यूनंतर राज्यभरात उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उच्च न्यायालयाने शनिवारी (ता. २९) चिंता व्यक्त केली. तसेच त्यांची काळजी घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच आणखी कोणत्याही तरुणाचा बळी जाऊ नये, असेही सरकारला बजावले.
गडचिरोलीतील जपतलाई गावातील एका आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींच्या मृत्यूच्या निषेधार्थ राज्यातील, विशेषतः आदिवासी पट्ट्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. शाळेतील आणखी तीन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली आणि स्वतःहून याचिका दाखल करून घेतली. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरेसा आणि वेळेवर वैद्यकीय उपचार कसा मिळेल, यासाठी योग्य पावले आणि उपाययोजना करा, डॉक्टर सर्वकाळ उपलब्ध असतील, याची खात्री करा आणि गरज भासल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत किंवा अन्न देण्यासाठी रुग्णालयात दाखल करा, असेही न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले. त्यावर, सरकारने तातडीने पावले उचलली असून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी ३१ ऑगस्टला ठेवली.
प्रकरण काय?
आदिवासीबहुल जपतालाई येथील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेच्या आवारात ६५ मुली राहत होत्या. त्यापैकी सहा मुलींना सापाने दंश केला. त्यात दोघींचा मृत्यू झाला, एकीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आणि चौथीची प्रकृती गंभीर असून तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्यभरातील महिला वसतिगृहाच्या दुरवस्थेवर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला असून पुण्याजवळ मांजरी येथे आदिवासी विद्यार्थी विविध शैक्षणिक व कल्याणकारी मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.