मुंबई

पश्चिम रेल्वेचा ‘स्पीड अपग्रेड’

CD

पश्चिम रेल्वेचा ‘स्पीड अपग्रेड’
मेल-एक्स्प्रेस धावणार ताशी १३० किमी वेगाने

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : पश्चिम रेल्वेने मुंबईहून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेगवाढीचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनसहून धावणाऱ्या २३ जोडी गाड्यांचा कमाल वेग ताशी ११० वरून १३० किमी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ ते ६० मिनिटांची बचत होण्याची शक्यता आहे.

वेगवाढीचा निर्णय एलएचबी रेक असलेल्या गाड्यांसाठी लागू करण्यात आला आहे. यामध्ये दादर-एकतानगर एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-भावनगर, वांद्रे टर्मिनस-भुज, वांद्रे टर्मिनस-ओखा, दादर-भगत की कोठी, दादर-श्रीगंगानगर, वेरावळ-वांद्रे टर्मिनस, इंदूर-हिसार आणि ओखा-जयपूर एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना २२ एलएचबी डब्यांसह ताशी १३० किमी वेगाने धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. अहमदाबाद-पाटणा एक्स्प्रेसलाही ताशी १३० किमी वेगाने धावण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या गाडीतील डब्यांची संख्या २० वरून २२ करण्यात आली आहे. त्यामुळे गाडीची प्रवासी क्षमता वाढण्यासोबतच प्रवासाच्या वेळेतही सुधारणा होण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्ष वेग अनेक बाबींवर अवलंबून
मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा कमाल वेग ताशी १३० किमी करण्यात आला असला, तरी या गाड्या संपूर्ण मार्गावर याच वेगाने धावतील असे नाही. कायमस्वरूपी आणि तात्पुरते वेगनिर्बंध, सिग्नल यंत्रणा, रुळांची स्थिती, स्थानकांवरील थांबे तसेच परिचालनातील परिस्थितीनुसार गाडीचा प्रत्यक्ष वेग ठरेल. सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच प्रत्येक गाडीच्या प्रवासाच्या वेळेत नेमकी किती बचत होईल, हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCA च्या किचनला ८७ गुण, तरी FDAची कारवाई; हायकोर्टाने घेतला आक्षेप, ५ लायसन्सवरील निलंबन हटणार

Success Story: वय 16, कंपनीत 15 कर्मचारी अन् वडिलांनाच देतो 2 लाखांचा पगार! केरळच्या या ‘AI Kid’ची भन्नाट कहाणी

Ather Konark Electric Scooter Launch : एथर एनर्जीची ‘कोनार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 200 किमीपर्यंत रेंज, बॅटरीवर 10 वर्षांची वॉरंटी

MPSC Exam : कोणताही क्लास न लावता ऋषीकेश राज्यात पहीला; उद्योग निरीक्षक व दुय्यम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कपदी निवड

Mamata Banerjee: मोठी बातमी! ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी स्वतः घेतली दखल

SCROLL FOR NEXT