मुंबई

बांधकाम प्रकल्पाचे लोखंडी स्ट्रक्चर कोसळले

CD

बांधकाम प्रकल्पाचा लोखंडी सांगाडा कोसळला

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २९ : प्रतीक्षानगर येथील मुंबई सहकारी बँकेच्या ‘सहकार भवन’ या निर्माणाधीन बहुमजली इमारतीच्या बांधकाम स्थळावर शुक्रवारी (ता. २८) रात्री १०च्या सुमारास लोखंडी सांगाडा आणि पत्र्याचे प्रवेशद्वार कोसळल्याने आसपासच्या व्यावसायिकांचे नुकसान झाले. या घटनेवेळी एक व्यावसायिक सावध होऊन तत्काळ तेथून पळाल्याने त्याचा जीव वाचला.

प्रतीक्षानगर परिसरात अशा प्रकारचे चार ते पाच अपघात यापूर्वीही घडले असून, बिल्डर आणि प्रशासनाच्या निष्काळजीविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी स्थानिक नागरिक सोमवारी म्हाडा कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. शिवसेना (ठाकरे गट) शाखाप्रमुख प्रभाकर भोगले यांनी सांगितले, की या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात आम्ही सोमवारी म्हाडा कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहोत. प्रभाग क्रमांक १७३ चे मनसे शाखाध्यक्ष लवू नर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले की रात्री घडलेल्या दुर्घटनेत सुदैवाने लोक तत्काळ बाजूला पळाल्याने मोठी जीवितहानी टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT