लालबाग-परळ होणार तिरुपतीमय!
‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चे थाटात आगमन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मानाचे स्थान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा शनिवारी ढोलताशांच्या गजरात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. आगमन सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे लाखो गणेशभक्त उपस्थित होते.
‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळातर्फे यंदा तिरुपती-तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर बालाजीच्या धर्तीवर गणेशमूर्ती आणि हैदराबादच्या स्वर्णमंदिराच्या धर्तीवर मंडप सजावट करण्यात येत आहे. यानिमित्ताने लालबाग-परळ परिसर तिरुपतीमय झालेला पाहायला मिळणार आहे. यंदा १०७ वे वर्ष साजरे करीत असलेल्या आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ची मूर्ती ही दरवर्षीच गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय असते. या वेळी सभोवतालच्या सजावटीत विष्णूचा अवतार श्री बालाजी देवस्थान येथील संकल्पनेनुसार गरुड, कीर्तिमुख, शंख, चक्र, कर्पूरयुक्त नामम् (टिळा) इत्यादी वैशिष्ट्यांसह चिंतामणी स्थानापन्न होत आहे. मुळातच अतिशय आकर्षक, देखण्या गणेशमूर्तीला सर्व आभूषणे व वैशिष्ट्यांचा साज लाभत असल्याने तिचे प्रासादिक सौंदर्य अधिकच उजळून निघणार आहे.
==
दाक्षिणात्य शैलीचा वापर
तिरुपती बालाजी मंदिरासह हैदराबाद येथील श्री वेंकटेश्वर मंदिर (स्वर्णगिरी), भुवनगिरी येथील मंदिराच्या स्थापत्य व वास्तुरचनेचीही प्रतिकृती येथे वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीने उभारण्यात येणार आहे. गोपुरम, दीपस्तंभ, पौराणिक कथांमध्ये असणारे व दाक्षिणात्य मंदिरांमध्ये बहुतांश आढळणारे याली किंवा व्याला (सिंह, हत्ती व घोड्याचे मिश्रण असलेला रक्षक प्राणी) अशा अनेक रचना येथील मंडप व अन्य सजावटीत उभारण्यात येणार असल्याचे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र डिचोलकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.