उमरखाडी समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव सरकार दरबारी
३३ इमारती, २० हजार चौरस मीटरचा भूखंड; रहिवाशांना किमान ५०० चौरस फुटांची सुसज्ज घरे, म्हाडाला ७५ हजार चौरस मीटरचे बांधीव क्षेत्रफळ उपलब्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : भायखळा येथील उमरखाडी परिसराच्या समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. ७०-८० वर्षे जुन्या असलेल्या उपकर प्राप्त (सेस) इमारतींबरोबरच येथे असलेल्या पीएमजीपी इमारती आणि खासगी मालकीच्या जवळपास ३६ इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यानुसार तब्बल २० हजार चौरस मीटरचा भूखंड पुनर्विकासासाठी उपलब्ध होणार असल्याने येथे गगनचुंबी इमारती उभ्या राहू शकणार आहेत. त्यामुळे म्हाडाने पाठवलेल्या प्रस्तावावर सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
कामाठीपुरा येथील मोडकळीस आलेल्या सेस इमारतींचा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ॲण्ड डीए) माध्यमातून पुनर्विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असतानाच म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने आता उमरखाडी परिसरातील सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील पीएमजीपी, सेस, खासगी इमारतीचा एकत्रित पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे. या भूखंडावरील इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या १,५०० रहिवाशांना पुनर्विकासाच्या माध्यमातून सुमारे ६५ हजार चौरस मीटरचे बांधीव क्षेत्रफळ उपलब्ध होणार असल्याने किमान ५०० चौरस फुटांचे घर मिळू शकणार आहे. तर म्हाडाला ७५ हजार चौरस मीटरचे बांधीव क्षेत्रफळ मिळू शकणार असल्याने त्यातून १,६००-२,००० घरे उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या प्रकल्पाच्या समूह पुनर्विकासाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर त्याबाबत शासन निर्णय जारी होईल. त्यानंतर म्हाडाकडून डीपीआर बनवून विकसकांच्या नियुक्तीसाठी निविदा काढल्या जातील.
चार एफएसआय मिळणार
उमरखाडी परिसरातील ज्या पीएमजीपी, सेस, पुनर्रचित आणि खासगी सेस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचे म्हाडाचे नियोजन सुरू आहे. त्याठिकाणी कमाल चार एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पुनर्वसन सदनिकांबरोबरच विक्रीयोग्य क्षेत्रफळ उपलब्ध होऊ शकेल.
कोणत्या इमारतींचा किती भूखंड?
- पीएमजीपी इमारती - ७,४३७ चौरस मीटर
- म्हाडा पुनर्रचित इमारती - १,७३८ चौरस मीटर
- म्हाडा अधिग्रहित इमारती - ४,००३ चौरस मीटर
- म्हाडाने ७९ अ अंतर्गत नोटीस दिलेल्या इमारती - १,४२५ चौरस मीटर
- खासगी सेस इमारती - ५,१८५ चौरस मीटर
- खासगी इमारती - ६४२ चौरस मीटर
कोणाच्या किती इमारती?
- म्हाडा पीएमजीपी - १०
- म्हाडा पुनर्रचित इमारती - ५
- म्हाडा अधिग्रहित इमारती - ८
- सेस इमारती - ३
- खासगी नॉन सेस इमारती - ३
- सेस इमारती (मालकाचा हक्क) - ५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.