मुंबई

जनसुविधा केंद्राचे खासदार गोयल यांच्या हस्ते उद्‍घाटन

CD

जनसुविधा केंद्राचे खासदार गोयल यांच्या हस्ते उद्‍घाटन
मुंबई, ता. ३० : स्थानिक रहिवाशांना स्वच्छ शौचालय, आंघोळ, लॉन्ड्री आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दहिसर येथे स्वच्छता व जनसुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्‍घाटन वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी (ता. ३०) केले. हे केंद्र कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलवर उभारण्यात आले आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, एचएसबीसी इंडिया, जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि मुंबई महापालिका यांचा या उपक्रमात सहभाग आहे. व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना गोयल म्हणालेस की गरज भासल्यास उत्तर मुंबईमध्ये अशा प्रकारची १०० सुविधा केंद्रे उभारता येतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला या सुविधांचा लाभ मिळू शकेल. आपल्या नागरिकांना आधुनिक आणि स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. सावरपाडा सुविधा केंद्रामध्ये २९ टॉयलेट सीट, सहा लॉन्ड्री मशीन आणि पाणी शुद्धीकरणाची सुविधा आहे. पाच सदस्यांच्या कुटुंबाला दरमहा १५० रुपयांमध्ये अमर्यादित शौचालय वापरण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. आरओ-फिल्टर केलेले पिण्याचे पाणी एक रुपये प्रतिलिटर दराने, तर सात किलो कपड्यांची लॉन्ड्री सुविधा ७० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

Sangola Politics: सांगोला राजकारणात ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी खळबळ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात

MSEB Short Circuit: महावितरणच्या डीपीतील शॉर्टसर्किटने १२ एकर ऊस भस्मसात; २५ लाखांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Pune Crime: प्रेमप्रकरणातील वादातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत, खराडी पोलिसांत गुन्हा दाखल

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT