मुंबई

दूध अन् प्रवास उद्यापासून महागणार

CD

दूध अन् प्रवास उद्यापासून महागणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : सध्या महागाईने सर्वसामान्यांना बराच मोठा दणका दिला आहे. साखरेसोबत स्वयंपाकघरातील रोजच्या गरजेच्या वस्तूंवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता १ सप्टेंबरपासून म्हशीचे सुटे दूध नऊ रुपयांनी तर रिक्षा-टॅक्सी प्रवास अनुक्रमे एक आणि दोन रुपयांनी महागणार आहे.
दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमती तसेच पशुखाद्याच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुधाचा सध्याचा घाऊक दर प्रतिलिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये करण्यात येणार आहे. मुंबईत हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) इंधनाच्या वाढत्या किमती व वाढलेल्या परिचालन खर्चाचा विचार करून किमान भाड्यात वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. नव्या दरानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. हे दोन्ही दर पहिल्या १.५ किलोमीटर अंतरासाठी लागू असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

Sangola Politics: सांगोला राजकारणात ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी खळबळ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात

MSEB Short Circuit: महावितरणच्या डीपीतील शॉर्टसर्किटने १२ एकर ऊस भस्मसात; २५ लाखांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Pune Crime: प्रेमप्रकरणातील वादातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत, खराडी पोलिसांत गुन्हा दाखल

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT