मुंबई

वैद्यकीयची पहिली यादी जाहीर

CD

वैद्यकीयची पहिली यादी जाहीर
१० हजार ५०९ विद्यार्थ्यांना संधी


मुंबई, ता. ३० : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत असलेल्या एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रमाच्या राज्याच्या कोट्याअंतर्गत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीत दोन्ही अभ्यासक्रमांच्या १० हजार ६४६ जागांपैकी १० हजार ५०९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या पहिल्या यादीत एमबीबीएसच्या आठ हजार १२९ जागांपैकी आठ हजार ६५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर बीडीएसच्या दोन हजार ५१७ जागांपैकी दोन हजार ४४४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

‘एमबीबीएस’च्या जागांमध्ये पहिल्या यादीत दिव्यांग व अनाथ संवर्गातील ६४ जागा रिक्त राहिल्या आहेत. तर बीडीएसच्या जागामध्ये पहिल्या यादीत दिव्यांग व अनाथ संवर्गातील ७३ जागा रिक्त राहिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता ३१ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ५.३०पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी धनादेशाद्वारे शुल्क भरण्यास परवानगी असेल, मात्र पुढील कामकाजाच्या दिवशी तो डिमांड ड्राफ्टने बदलणे आवश्यक राहील. उमेदवाराने पुढील कामकाजाच्या दिवशी डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

Nepal Flood Viral Video : नेपाळमधील महापुरात देवदूत बनून आली म्हैस, तरुणाचा वाचवला जीव; हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून नेटकरीही भावूक

Ranjangaon Drunk Driving: रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्यावर मद्यधुंद पिकअप चालकाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : मुंबईतील वांद्रे परिसरात महिलेच्या गाडीची ९ वर्षांच्या मुलाला धडक; जागीच मृत्यू

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT