मुंबई

कुणाच्याही दबावात काम करणार नाही

CD

कुणाच्याही दबावात काम करणार नाही!
परभणी शेतकरी मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३० : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला विरोध आणि आव्हानांची पार्श्वभूमी बाजूला सारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा अत्यंत उत्साहात आणि सुरळीत पार पडला. मनोज जरांगे यांनी हा मेळावा रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र परभणीचा मेळावा घेत उपमुख्यमंत्र्यांनी कुणाच्या दबावात नव्हे तर त्यांच्या पद्धतीने राजकारण करणार असल्याचे संकेत दिले.

​मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील मेळावा न घेण्याचे आवाहन केले होते. खासदार बंडू जाधव यांना तसा फोनही केला होता; मात्र अखेरच्या क्षणी मेळावा रद्द करणे योग्य नसल्याचे त्यांनी जरांगे यांना सांगितले. शिंदे यांनीदेखील आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली तयारी आणि जनतेचा उत्साह पाहता कार्यक्रम रद्द करणे शक्य नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यादरम्यान काही मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्या वेळी मंचावरून एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती संयमाने हाताळली. या आंदोलकांना ताब्यात घेऊ नका, ते आमचेच आहे, अशा त्यांनी सूचना पोलिसांना देत या आंदोलकांना व्यासपाठीवर बोलावले व त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले. त्यानंतर मराठा आंदोलक शांत झाले आणि निघून गेले. ‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणे आणि सर्व समाजघटकांचे संरक्षण करीत विकास साधणे हीच महायुती सरकारची भूमिका आहे,’ असे स्पष्ट आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले.

मनोज जरांगे-पाटील यांच्या विनंतीवरून एकनाथ शिंदे यांनी त्यांना आम्हाला गृहीत धरू नका, असा अप्रत्यक्ष संदेश दिला; मात्र सोबत आपल्या भाषणात एक तरुण मराठा समाजासाठी तळमळीने आंदोलन करतोय, या शब्दात त्यांचा सन्मानही केला. शिंदे यांनी महायुती सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. त्यांच्या मागण्या जवळपास मान्य केल्या व पुढेही करू, असेही आश्वस्त केले.

‘सारथी’ला ३०० कोटींचा निधी
...
मराठा आरक्षणासाठी ५,२०० अधिसंख्य पदांवरील उमेदवारांना नोकरी, १० टक्के आरक्षण, ‘सारथी’ला ३०० कोटींचा निधी, अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्जमर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणे, कुणबी प्रमाणपत्रांचा मार्ग सुकर करणे आणि आंदोलनातील मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसह एसटीत नोकरी, यांसारखे ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी या वेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

Nepal Flood Viral Video : नेपाळमधील महापुरात देवदूत बनून आली म्हैस, तरुणाचा वाचवला जीव; हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून नेटकरीही भावूक

SCROLL FOR NEXT