नाहूरमध्ये उभारणार अत्याधुनिक व्यायामशाळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुलुंडच्या नाहूर भागात स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेकडून ‘पीसीओ चौकी आणि अत्याधुनिक व्यायामशाळा’ उभारण्यात येणार आहे. नाहूर येथील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर ही तळमजला अधिक तीन मजली इमारत साकारली जाणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी महापालिकेच्या वतीने तीन कोटी ८० लाख २८ हजार ३९५ रुपये इतक्या कंत्राट रकमेच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. नगर उपअभियंता (इमारत बांधकाम) पूर्व उपनगरे विभागामार्फत हे काम पूर्ण केले जाणार आहे. महापालिका वास्तुविशारदांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार एकूण २०६.८६ चौरस मीटर जागेवर ४६०.२२ चौ.मी. बांधकाम केले जाईल. तळमजला व स्टिल्ट येथे मीटर रूम, पंप रूम आणि पार्किंगची सोय असेल. पहिला मजल्यावर स्टोअर रूम, भांडारगृह एक ते चार, तर दुसऱ्या मजल्यावर कार्यालयीन जागा आणि महिला व पुरुषांसाठी चेंजिंग रूम, तिसऱ्या मजल्यावर अत्याधुनिक साहित्य आणि दोन मिमी जाडीच्या रबर मॅटसह व्यायामशाळा असणार आहे. महापालिकेने या कामासाठी हल्को इन्फ्राप्रोजेक्टस् यांची निविदा मंजूर करण्याची शिफारस केली आहे. या प्रकल्पाची एकूण सविस्तर अंदाजपत्रकीय किंमत ४,६१,८८,९०७ इतकी आहे. कामाचा करारनामा झाल्यापासून पावसाळ्यासह १८ महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदारावर असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.