बदल्यांसाठी राजकीय शिफारशींची लाट!
पालिकेतील २२५ कर्मचाऱ्यांच्या नावांपुढे नेत्यांचे शिक्के
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : महापालिकेतील प्रशासकीय बदल्या आणि पदस्थापनांमध्ये राजकीय हस्तक्षेपाचा मोठा प्रकार समोर आला आहे. महापालिकेतील तब्बल २२५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशींचा वापर करण्यात आल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाकडून मागवलेल्या माहितीनुसार, राजकीय नेत्यांच्या नावांचा थेट उल्लेख अधिकाऱ्यांच्या नावांसमोर आढळला आहे. यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
---
नेत्यांच्या शिफारसपत्रांची संख्या
एकनाथ शिंदे १०
रामदास आठवले ९
गिरीश महाजन ७
कालिदास कोळंबकर ७
मंगेश कुडाळकर ६
अण्णा बनसोडे ६
तुकाराम काते ६
मुरजी पटेल ५
दिलीप लांडे ५
---
इतरही नेत्यांची नावे
याशिवाय नरहरी झिरवाळ, सुमीत वानखेडे, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, इंद्रनील नाईक, संतोष बांगर, राम कदम, किसन कथोरे आणि बच्चू कडू यांच्या नावाने प्रत्येकी चार; तर चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, भरतशेठ गोगावले, उदय सामंत, रवींद्र वायकर, प्रवीण दरेकर यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या नावाने प्रत्येकी तीन शिफारशी यादीत नोंदवल्या गेल्या आहेत. राहुल नार्वेकर, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, अमोल खटाळ आणि सना मलिक या राजकीय दिग्गजांची नावेही यादीत आहेत.
----
महापालिकेतील बदल्या सेवाज्येष्ठता, कार्यक्षमता आणि पारदर्शक निकषांनुसार होणे अपेक्षित आहे; मात्र काही अधिकारी सोयीच्या बदलीसाठी राजकीय दबाव आणत असल्याचे या २२५ जणांच्या यादीवरून स्पष्ट होत आहे. महापालिका आयुक्तांनी या दबावतंत्राचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.