कोकणातील गणेशोत्सवासाठी
१.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण
मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या धावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २६२ गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. त्यातील २०० आरक्षित विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत एक लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरहून कोकणातील विविध ठिकाणांसाठी या गाड्या धावणार असून, ही सेवा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असला, तरी तत्पूर्वीच मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणातील गावांकडे रवाना होतात. उत्सवाच्या काळात नियमित गाड्यांचे आरक्षण काही सेकंदांतच पूर्ण होत असल्याने विशेष गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्यांमध्ये २०० आरक्षित आणि ६२ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. यामुळे गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन करण्यास रेल्वेला मदत होणार आहे.
स्थानकांवर अतिरिक्त व्यवस्था
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रतीक्षा क्षेत्र आणि रांग व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवाशांना पाणी, खाद्यपदार्थ तसेच स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
----
विशेष गाड्यांची आकडेवारी
एकूण विशेष गाड्या - २६२
आरक्षित विशेष गाड्या - २००
अनारक्षित विशेष गाड्या - ६२
आरक्षण केलेले प्रवासी - १,१७,६८२
सावंतवाडी रोडसाठी सेवा - ११२
रत्नागिरीसाठी सेवा - ६४
मडगावसाठी सेवा - २४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.