मुंबई

नेपाळमधून ४८ पर्यटकांची सुखरूप घरवापसी

CD

नेपाळमधून ४८ पर्यटकांची सुखरूप घरवापसी
शिवसेनेच्या बचाव पथकाचे यश

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३१ : नेपाळमधील जलप्रलयानंतर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी शिवसेनेकडून विशेष मदत मोहीम राबवली जात आहे. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते राहुल कनाल यांच्या पथकाने नेपाळमध्ये अडकलेल्या ४८ मराठी पर्यटकांना सुखरूप परत आणले आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिली.
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ​कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले ३७ पर्यटक काठमांडू-गोरखपूर बस आणि तेथून विमानाने २९ ऑगस्टला पुण्यात पोहोचले. तसेच नाशिकच्या पेठ तालुक्यातील अडकलेल्या ११ विद्यार्थ्यांना सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून अन्न, औषधे पुरवून सुरक्षित नाशिकला पाठवण्यात आले. मुंबईतील बेपत्ता ६६ पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, माणुसकीच्या नात्याने शिवसेना सीमा ओलांडून मदत करीत असल्याचे निरुपम म्हणाले.
...
बाबरप्रेम आवरावे!
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका करताना निरुपम म्हणाले, बाबरने भारतावर केलेले अत्याचार विसरता येणार नाहीत, त्यामुळे ओवेसी यांनी बाबरप्रेम आवरावे. अयोध्येतील बाबरी मशिदीचा कलंक पुसण्याचे काम आम्ही केले असून, परराष्ट्र संबंध वेगळे असले तरी बाबराचे पाप धुतले जाऊ शकत नाही, असा घणाघात त्यांनी या वेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT