मुंबई

डॉक्टर, अभियंत्यांच्या पदव्यांची होणार चौकशी

CD

डॉक्टर, अभियंत्यांच्या पदव्यांची होणार चौकशी
आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३१ : बनावट आणि अमान्य अभियांत्रिकी पदविका आणि पदवी प्रमाणपत्राच्या आधारे महापालिकेत दुय्यम अभियंतापदावर बेकायदा नियुक्ती मिळवून सेवेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित अभियंत्याला चौकशी प्रलंबित ठेवून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. तसेच पालिकेत कार्यरत असणाऱ्या सर्व अभियंते आणि डॉक्टरांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याचा धडक निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा घोटाळा चव्हाट्यावर आणला होता. पालिकेतील एका अभियंत्याने बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला होता. या लक्षवेधीनंतर प्रशासनाने संबंधित अभियंत्याची कागदपत्रे तपासली असता, त्याच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे महापालिकेच्या भरती प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नगर अभियंता कार्यालयाने आज (ता. ३१) परिपत्रक काढून याप्रकरणी सर्व विभागांना तातडीचे निर्देश दिले आहेत. याचा सविस्तर अहवाल नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडे तत्काळ पाठवावा, असे आदेश देण्यात आले आहेत. ​या धडक कारवाईमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे पालिकेत दडून बसलेल्या इतर संशयित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

SCROLL FOR NEXT