मुंबई

साताऱ्यातील डॉक्टरचा मुंबईत मृत्यू

CD

साताऱ्यातील डॉक्टरचा मुंबईत मृत्यू

बंदूक परवाना फिटनेस प्रमाणपत्रावरून दबावाचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : सातारा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी बंदूक परवान्यासाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून राजकीय व बाह्य दबाव आणला जात असल्याची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर कथित दबाव सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, २७ ऑगस्ट रोजी त्यांनी सायन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (ता.३१) त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार उपचारादरम्यान त्यांना कार्डिॲक अरेस्ट आला.

रुपनवर यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला बंदूक परवान्यासाठी आवश्यक फिटनेस प्रमाणपत्र देण्यावरून डॉ. रुपनवर यांच्यावर दबाव होता. त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन तक्रारीही केल्या होत्या. सोशल मीडियावरील पोस्ट व व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे त्यांनी आपल्याला त्रास दिला जात असून, कारवाई व सेवेतून निष्कासनाचा प्रयत्न होत असल्याचा दावा केल्याचे सांगण्यात येते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ते मुंबईत आले होते; मात्र संबंधित अधिकाऱ्यांची भेट न झाल्याचा दावा सहकाऱ्यांनी केला. त्यानंतर सायन रेल्वे स्थानक परिसरातील टॉवरवर त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा कार्डिॲक अरेस्ट आल्याचे सांगण्यात येते. मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंढे यांच्या आत्महत्येची घटनाही या पार्श्वभूमीवर चर्चेत आली आहे. दोन्ही घटनांचा थेट संबंध अद्याप स्पष्ट नाही.

दोषींवर कारवाईची मागणी
पालिका मार्ड आणि सेंट्रल मार्डने डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूची वेळबद्ध, स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून कथित छळ, धमकी किंवा बाह्य दबावासाठी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉक्टरांना सुरक्षित व सन्मानजनक कार्य परिसर मिळावा, यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही संघटनांनी म्हटले आहे.

CM Devendra Fadnavis : डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT