मुंबई

‘कृषी’च्या तिसऱ्या यादीत सात हजार विद्यार्थ्यांना संधी

CD

मुंबई, ता. १ : कृषी शिक्षणाअंतर्गत असलेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्यविज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न तंत्रज्ञान, बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान, बी.टेक. जैवतंत्रज्ञान बीएससी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीत सात हजार ३२८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच या तिसऱ्या यादीमध्ये दोन हजार ५३४ विद्यार्थांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

कृषी अभ्यासक्रमासाठी दोन हजार ५३४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यांचे प्रवेश ऑटो फ्रीज झाले आहेत. या विद्यार्थ्यांना संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

राज्यातील कृषी अभ्यासक्रमाच्या सात हजार ३२८ प्रवेशांचे जागावाटप विद्यापीठनिहाय पाहिले असता तिसऱ्या फेरीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अंतर्गत महाविद्यालयांना २,९२६ जागांचे वाटप झाले आहे. तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अंतर्गत महाविद्यालयांना २,०६१ जागांचे वाटप झाले आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अंतर्गत महाविद्यालयांना १,८०४ जागांचे वाटप झाले आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अंतर्गत महाविद्यालयांना ५३७ जागांचे वाटप झाले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी १ ते ३ सप्टेंबरदरम्यान मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. तर १ ते ४ सप्टेंबरदरम्यान केंद्रीभूत प्रवेश फेरी १, २ व ३ मध्ये प्रवेशाचे वाटप निश्चित झालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे व आवश्यक ते शुल्क भरणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमनिहाय तिसऱ्या फेरीचे जागावाटप

अभ्यासक्रम जागावाटप
बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी ५,२७६
बी. टेक. अन्न तंत्रज्ञान ५३४
बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या ४४५
बी.टेक. जैवतंत्रज्ञान ३१७
बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन ४१५
बी.टेक. कृषी अभियांत्रिकी २६१
बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या ४५
बी.एस्सी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान १८
बी.एफ.एस्सी. मत्स्यविज्ञान १७

Pune News : एमसीसीआयएच्या हेल्पलाइनचा दहा हजार सल्लामसलतींचा टप्पा पूर्ण; देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एमएसएमईना मदत

Alephata News : नारायणगावला पैसे आणण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; बोरी बुद्रुक येथील कालव्याजवळ आढळली मोटारसायकल

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख- आदिल फरास यांच्यात जोरदार वाद; पालिकेच्या दारात कार्यकर्ते एकवटले

Shahajibapu Patil : ‘आम्ही उष्टे खाणारे नाही; तुमचे तुम्हाला राहू द्या’; सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा

Mhada House: म्हाडाचा गेमचेंजर निर्णय! विक्रीविना पडलेल्या घरांचा होणार 'असा' वापर; सर्वसामान्यांसाठी मोठी संधी

SCROLL FOR NEXT