मुंबई

मुंबईतील १०.५ लाख मालमत्ताधारकांना पालिकेकडून कर बिले

CD

११लाख मालमत्ताधारकांना पालिकेकडून कर बिले
मुंबई, ता. ३१ : महापालिकेने शहरातील तब्बल १०.५०लाख मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची (प्रॉपर्टी टॅक्स) बिले पाठवण्यास सुरुवात केली आहे. यंदाची बिलिंग प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून, व्हॉट्सॲप आणि क्यूआर कोडद्वारे थेट बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

​महापालिकेने यंदा मालमत्ता कराच्या माध्यमातून ७,००० कोटी रुपयांच्या महसूल संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबईत एकूण २.५४ लाख इमारती असून, पहिल्या टप्प्यात या इमारतींमधील रहिवाशांना बिले पाठवली जात आहेत. मोकळ्या भूखंडांच्या (ओपन प्लॉट्स) मालकांना दुसऱ्या टप्प्यात बिले पाठवली जातील. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या ३.६ लाख लहान घरांना मालमत्ता करातील सवलत कायम असणार आहे. मार्च २०२६मध्ये ''मुंबई महापालिका कायदा'' कलम १५४ मधील सुधारणेमुळे पालिकेला २०१०पासून प्रलंबित असलेला कर वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१०मध्ये लागू झालेल्या भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीच्या वादानंतर २०१४ च्या न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार अनेकजण केवळ ५० टक्के कर भरत होते. मात्र, सुधारित नियमांनुसार ज्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम आकारली गेली असेल, त्यांना पालिका परतावा (रिफंड) देणार आहे.

​महत्त्वाच्या बाबी:

​सवलत योजना: कराची संपूर्ण रक्कम एकाच हप्त्यात भरल्यास ४ टक्के, तर दोन हप्त्यांत भरल्यास २ टक्के सवलत मिळेल.

​गेल्या वर्षाची कामगिरी: पालिकेने गतवर्षी ७,३४१ कोटींच्या उद्दिष्टापेक्षा ७,६१० कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली होती.

​विलंबाचे कारण: मूल्यनिर्धारण आणि संकलन विभागाचे अधिकारी विशेष कामात व्यस्त असल्याने यंदा बिले पाठवण्यास काहीसा विलंब झाला.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT