मुंबई

गणपती मंडळे ‘सीपीआर’साठी सज्ज

CD

गणपती मंडळे ‘सीपीआर’साठी सज्ज
दक्षिण मुंबईतील ५१ मंडळांच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण; फोल्डेबल स्ट्रेचरही उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील गणपती मंडपांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत सुरुवातीच्या काही मिनिटांत मदत मिळावी, यासाठी दक्षिण मुंबईतील गणपती मंडळांच्या स्वयंसेवकांना सीपीआर आणि प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच मंडळांना फोल्डेबल स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले.
वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात असून, दक्षिण मुंबईतील ५१ गणपती मंडळांशी यासाठी समन्वय करण्यात आला आहे. गिरगाव, खेतवाडी, लालबाग, परळ, वाळकेश्वर, प्रभादेवी, वरळी, नागपाडा आणि चिंचपोकळी यांसह विविध भागांतील मंडळांचा यात समावेश आहे.
प्रशिक्षित स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थिती ओळखणे, प्राथमिक मदत देणे आणि गरज भासल्यास संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे वैद्यकीय मदतीपर्यंत पोहोचवणे याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. मंडळांना देण्यात येणारे फोल्डेबल स्ट्रेचरही याच उद्देशाने वापरता येणार आहे.
वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलचे सेंटर हेड डॉ. वीरेंद्र चौहान यांनी सांगितले, की गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असल्याने उत्सवाच्या नियोजनात आपत्कालीन वैद्यकीय तयारीलाही महत्त्व दिले जाणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या काही मिनिटांत योग्य प्राथमिक मदत मिळाल्यास पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत परिस्थिती हाताळण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. गणेशोत्सवाच्या काळात मंडपांमध्ये वाढणारी गर्दी, अरुंद जागा आणि भाविकांची सततची ये-जा यामुळे एखाद्या व्यक्तीला तातडीने बाहेर काढणेही आव्हानात्मक ठरू शकते. अशा वेळी स्ट्रेचर आणि प्रशिक्षित स्वयंसेवक उपलब्ध असणे उपयोगी ठरू शकते.

वेळीच उपचार महत्त्वाचा
गणेशोत्सवात मंडपांमध्ये दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते. गर्दीच्या ठिकाणी चक्कर येणे, पडणे, दुखापत होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अचानक हृदयाशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंतचा वेळ महत्त्वाचा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर मंडळांच्या स्वयंसेवकांना प्राथमिक उपचार आणि सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Retirement Planning: 60 नाही, 43 व्या वर्षीच रिटायरमेंट! 85 लाखांचा फंड अन् 39 हजार भाडे, कपलचा प्लॅन नेमका काय?

का मोडला 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा संसार? म्हणाली, 'एखाद्याला निघून जायचं असतं तेव्हा...'

मंगळ-बुधाचा विशेष योग! करिअर अन् पैशांच्या बाबतीत चमकणार ‘या’ राशींचे नशीब?

Palghar News: श्वानाच्या पिल्लाला बिबट्याचे अभय, बावड्या गावातील घटना सीसीटीव्हीत कैद

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT