एबीसी, अपार आयडीची अनेकांची प्रक्रिया अपूर्ण
मुंबई, ता. १ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्सचे डिजिटल स्वरूपात संकलन, संचयन, हस्तांतरण आणि पडताळणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एबीसी आयडी/अपार आयडी अनिवार्य केले आहे. तरीही अद्याप ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप आपला एबीसी आयडी/अपार आयडी विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांची यादी संबंधित महाविद्यालये व संस्थांना देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज भरताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपला वैध एबीसी आयडी/अपार आयडी नमूद करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जात नमूद केलेला आयडी त्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रावर दर्शविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे वैध एबीसी आयडी/अपार आयडी उपलब्ध नाही किंवा ज्यांनी तो विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र विद्यापीठामार्फत निर्गमित केले जाणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाने यापूर्वी विविध परिपत्रकांद्वारे विद्यार्थ्यांना एबीसी आयडी/अपार आयडी तयार करून विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच या अनुषंगाने विशेष शिबिराचे आयोजनही विद्यापीठामार्फत करण्यात आले होते; मात्र अद्याप ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने आपला वैध एबीसी आयडी/अपार आयडी तयार करून तो विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडावा, असे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.