मुंबई

आणखी चार होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी

CD

आणखी चार होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी
प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमधील नोंदणी प्रक्रियेला वेग आला असून, आणखी चार होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत एकूण १० होमिओपॅथी डॉक्टरांची परिषदेमध्ये नोंदणी झाल्याची माहिती इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनकडून देण्यात आली.
होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेला ४ ऑगस्टपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात सहा डॉक्टरांना नोंदणी मिळाली होती. त्यापाठोपाठ आता आणखी चार डॉक्टरांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याने नोंदणी झालेल्या डॉक्टरांची संख्या दहावर पोहोचली आहे. या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांचे इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, पूर्ण पडताळणी प्रक्रिया पार पडल्यानंतर आगामी काळात पात्र होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी सुरळीतपणे सुरू राहील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत प्रक्रियेवरच भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीसाठीचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एमसीसीआयएच्या हेल्पलाइनचा दहा हजार सल्लामसलतींचा टप्पा पूर्ण; देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एमएसएमईना मदत

Alephata News : नारायणगावला पैसे आणण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; बोरी बुद्रुक येथील कालव्याजवळ आढळली मोटारसायकल

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख- आदिल फरास यांच्यात जोरदार वाद; पालिकेच्या दारात कार्यकर्ते एकवटले

Shahajibapu Patil : ‘आम्ही उष्टे खाणारे नाही; तुमचे तुम्हाला राहू द्या’; सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा

Mhada House: म्हाडाचा गेमचेंजर निर्णय! विक्रीविना पडलेल्या घरांचा होणार 'असा' वापर; सर्वसामान्यांसाठी मोठी संधी

SCROLL FOR NEXT