मुंबई

धावत्या एक्स्प्रेसमध्ये दिवा पेटवून पूजा

CD

धावत्या एक्स्प्रेसमध्ये दिवा पेटवून पूजा
रेल्वे प्रवाशावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : धावत्या एक्स्प्रेसच्या आरक्षित बर्थवर दिवा पेटवून पूजा करणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले. डब्यात खुली ज्वाळा पेटवल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच मध्य रेल्वेने संबंधित प्रवाशावर कारवाई केली. त्याला भुसावळ स्थानकात उतरवून त्याच्याकडील पूजेचे साहित्य जप्त करण्यात आले.
ट्रेन क्रमांक १२७८२ हजरत निझामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेसच्या ए-१ डब्यात सोमवारी (ता. ३१) हा प्रकार घडला. प्रवाशाला भुसावळ स्थानकात उतरवण्यात आले. चौकशीत संबंधित प्रवासी ५५ वर्षांचा असून ग्वाल्हेरचा असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे कायद्याअंतर्गत मंगळवारी (ता. १) कारवाई करण्यात आली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार नोटीस देऊन प्रवाशाची सुटका करण्यात आली. रेल्वे कायद्यानुसार अशा प्रकारात दंडासह कारावासाची तरतूद आहे. कलम १५३ अंतर्गत दोषीला पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो, असा इशारा मध्य रेल्वेने दिला. डब्यात दिवा, मेणबत्ती, अगरबत्ती किंवा अन्य ज्वलनशील वस्तू पेटवू नये. अशा प्रकारांमुळे आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एमसीसीआयएच्या हेल्पलाइनचा दहा हजार सल्लामसलतींचा टप्पा पूर्ण; देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एमएसएमईना मदत

Alephata News : नारायणगावला पैसे आणण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; बोरी बुद्रुक येथील कालव्याजवळ आढळली मोटारसायकल

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख- आदिल फरास यांच्यात जोरदार वाद; पालिकेच्या दारात कार्यकर्ते एकवटले

Shahajibapu Patil : ‘आम्ही उष्टे खाणारे नाही; तुमचे तुम्हाला राहू द्या’; सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा

Mhada House: म्हाडाचा गेमचेंजर निर्णय! विक्रीविना पडलेल्या घरांचा होणार 'असा' वापर; सर्वसामान्यांसाठी मोठी संधी

SCROLL FOR NEXT