गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा मिळेना
म्हाडाच्या स्वारस्य निविदेला केवळ एका विकसकाचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्यासाठी मुंबईसह एमएमआर क्षेत्रात अपेक्षित जमीनच मिळत नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने मुंबई आणि परिसरात जागा उपलब्ध व्हावी म्हणून इच्छुक विकसकांकडून स्वारस्य निविदा मागवल्या होत्या. मात्र त्याला थंड प्रतिसाद मिळाला असून, केवळ एकाच विकसकाचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरांसाठी जमीन कधी मिळणार, कामगारांना घरे कधी मिळणार, असे प्रश्न उभा राहत आहेत.
गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याची घोषणा राज सरकारने दोन दशकांपूर्वी केली असली, तरी आतापर्यंत सुमारे १७ हजार कामगारांना घरे मिळाली असून, जवळपास एक लाख कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या गिरणी कामगारांसाठी घरे उभारण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाने खासगी विकसकांकडून जागा उपलब्ध करून घेण्यासाठी जुलै महिन्यात स्वारस्य निविदा (ईओआय) मागवल्या होत्या. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना किंवा अन्य घरकुल योजनेअंतर्गत ज्या विकसकाकडे बोरिवली, ठाणे, मिरा-भाईंदर आणि उलवे येथे कमीत कमी एक एकर जागा आहे तसेच संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून लेआऊट, विविध परवानग्या मंजूर आहेत अशा विकसकांकडून घरांच्या उभारणीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. निविदा भरण्यासाठी २५ ऑगस्ट अंतिम मुदत होती. त्यानुसार केवळ एकच विकसकाने वांगणी येथील आणखी एका जागेचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, वांगणी येथील घरांच्या प्रकल्पाला आधीच गिरणी कामगारांची नापसंती आहे. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरांच्या उभारणीसाठी पुन्हा वांगणीतील जागेचा विचार होणे कठीण आहे. एकंदरीत महामुंबईतदेखील गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा मिळत नसल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.