मुंबई

रीलस्टारचा जीवघेणा थरार

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : दोन-चार सेकंदांच्या रीलसाठी जीव धोक्यात घालण्याची ‘क्रेझ’ रेल्वे परिसरातही पोहोचली आहे. सोशल मीडियावर व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी रेल्वे पूल, स्थानक परिसरापासून थेट धावत्या लोकलच्या दरवाजापर्यंत स्टंट केले जात आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अशा धोकादायक चित्रीकरण आणि स्टंटप्रकरणी आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी आठ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून १० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

कोपर-भिवंडी रोडदरम्यान उल्हास नदीवरील रेल्वे पुलावर एका महिलेसह दोन पुरुष रील बनविताना आढळले. भिवंडी रोड पोस्टच्या हद्दीतील किलोमीटर ५२/२ येथे हा प्रकार निदर्शनास आला. धोकादायक ठिकाणी चित्रीकरण केल्याप्रकरणी तिघांवर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करून एक हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वडाळा रोड येथे तर एका तरुणाने धावत्या लोकलच्या दरवाजावर सेफ्टी बेल्ट बांधून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. जीवाला धोका असल्याचे माहीत असूनही केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी केलेला हा प्रकार त्याला चांगलाच महागात पडला. त्याच्यावर कारवाई करून एक हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सायन-माटुंग्यातही धुमाकूळ
सायन स्थानकात रील बनविणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. माटुंगा वर्कशॉप पोस्टने अशाच प्रकारच्या चार प्रकरणांत गुन्हे दाखल करून पाच हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. जीटीबीनगर स्थानकातील प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर त्याच्या आधारे कारवाई करण्यात आली आणि एक हजार ५०० रुपयांचा दंड वसूल झाला. भायखळा येथे ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित झालेल्या दोन स्टंट व्हिडिओंच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

कारवाईनंतरही हौस कायम
कारवाईचा बडगा उगारला जात असला, तरी रीलस्टारची ही जीवघेणी हौस थांबलेली नाही. काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी रेल्वे पूल, रूळ किंवा धावत्या लोकलचा दरवाजा निवडणे म्हणजे स्वतःच्या जीवासोबतच इतर प्रवाशांच्याही सुरक्षेला धोका निर्माण करणे आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा व्हिडिओंचे अनुकरण होण्याची शक्यता असल्याने हा प्रकार केवळ संबंधित व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही.

रेल्वे कायद्यानुसार अशा प्रकारांविरोधात कारवाईची तरतूद असली, तरी दंड आणि गुन्ह्यांनंतरही ‘रीलबाजी’ सुरूच असल्याचे दहा प्रकरणांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे केवळ कारवाई करण्यापेक्षा धोकादायक ठिकाणी देखरेख वाढविणे आणि अशा प्रकारांना सुरुवातीलाच आळा घालणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

आकडेवारी (२०२५-२०२६)

दाखल गुन्हे- १०
प्रकरणे निकाली- ८
प्रकरणे न्यायप्रविष्ट- २
एकूण वसूल दंड- १०,६०० रुपये
माटुंगा वर्कशॉप पोस्टकडून वसूल दंड- ५,५०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT