मुंबई

जिया रायची ‘ट्रिपल क्राउन’ला गवसणी

CD

मुंबई, ता. २ : ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) असलेल्या १८ वर्षीय भारतीय पॅरा जलतरणपटू जिया राय हिने खुल्या पाण्यातील जलतरणात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. न्यूयॉर्कमधील ‘२० ब्रिजेस स्विम अराउंड मॅनहॅटन’ ही ४८ किलोमीटरची खडतर एकेरी जलतरण मोहीम तिने ३० ऑगस्टला आठ तास ५३ मिनिटांत पूर्ण केली. या कामगिरीसह ‘ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन’ पूर्ण करणारी जगातील पहिली महिला पॅरा जलतरणपटू ठरल्याचा दावा तिच्या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आला आहे.

मॅनहॅटन बेटाभोवतीचे अंतर पूर्ण केल्यानंतर न्यूयॉर्कमधील भारताचे उपमहावाणिज्यदूत विशाल जयेशभाई हर्ष यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

तीन खडतर मोहिमांचा टप्पा
जियाच्या ‘ट्रिपल क्राउन’मध्ये तीन आव्हानात्मक खुल्या पाण्यातील जलतरण मोहिमांचा समावेश आहे. तिने २०२४ मध्ये इंग्लिश चॅनेल, २०२५ मध्ये कॅटालिना चॅनेल आणि २०२६ मध्ये मॅनहॅटनभोवतीची ‘२० ब्रिजेस’ मोहीम पूर्ण केली. यापूर्वी तिने २०२२ मध्ये पाल्क सामुद्रधुनीही पार केली आहे.

भरती-ओहोटीच्या प्रवाहांचे आव्हान
‘२० ब्रिजेस स्विम अराउंड मॅनहॅटन’ ही जगातील कठीण खुल्या पाण्यातील जलतरण मोहिमांपैकी एक मानली जाते. वेगवान भरती-ओहोटीचे प्रवाह, बदलते हवामान, सुमारे २० अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी आणि मार्गावरील बोटींची वाहतूक यामुळे या मोहिमेचे आव्हान वाढते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव
इंग्लिश चॅनेल एकेरी पोहून पार करणारी एएसडी असलेली जगातील पहिली मुलगी असल्याचेही प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तिच्या कामगिरीची दखल घेत तिला २०२४ मध्ये ‘डब्ल्यूओडब्ल्यूएसए’ पुरस्कार, २०२३ मध्ये दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि २०२२ मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


मुंबई : जिया रायने ‘ट्रिपल क्राउन’ खडतर एकेरी जलतरण मोहीम पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT